बातम्या

सीपीआरमध्ये स्वतंत्र कॅन्सर सेंटर सुरू करा : आमदार जयश्री जाधव

Start independent cancer center in CPR

By nisha patil - 7/24/2023 4:46:21 PM
Share This News:

 विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे वेधले लक्ष : ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण आवश्‍यकच 

कोल्‍हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. 

सीपीआर रुग्णालय कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यासह कर्नाटकातील हजारो लोकांसाठी आधारवड आहे. सीपीआरमधील समस्या आणि कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटरच्या मागणीकडे आमदार जयश्री चंद्रकांत (अण्णा) जाधव यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘सीपीआर’ म्हणजे थोरला दवाखाना. हे रुग्णालय सर्वसामान्यांचे आधारवड आहे. या रुग्णालयात नेमक्या काय समस्या आहेत, त्रुटी काय आहेत आणि कोणत्या उपाययोजनांवर भर द्यायला हवा याकडे आज सभागृहाचे लक्ष वेधले.
सीपीआरमध्ये कॅन्सरची प्राथमिक तपासणी होते. पण पुढील तपासणी करता सुसज्ज अशी प्रयोगशाळा नाही. तसेच कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंटला लागणारे औषधे मोफत किंवा सवलतीच्या दरात देण्याची सुविधा उपलब्ध नाही. या रुग्णांच्यावर उपचार साठी स्वतंत्र सेंटर  नसल्यामुळे सर्वमान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाया जातो. तसेच काही  गोरगरीब रुग्णांना वेळ व पैसा अभावी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमावा लागला आहे. केवळ पैसा नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांचा जीव जाणे हे मनाला त्रासदायक देणार आहे. यामुळे मुंबई, नागपूर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरमध्ये स्वतंत्र असे कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विधानसभेत केले आहे केल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. सीपीआरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू झाल्यास, त्यासाठी लागणारी मशिनरी देण्याचे आश्वासन रोटरी क्लबने दिल्याचेही यावेळी आमदार जाधव यांनी सांगितले.
सीपीआर मधील ब्लड बँकची गाडी खराब आहे, वर्ग चार  वॉर्ड बॉयची पद रिक्त आहेत, अपघात विभागाची विस्तारीकरण नाही, शेंडा पार्क येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे, एमआरआय मशीनची मागणी प्रलंबित आहे. तसेच सीपीआर येथील इमारत व रस्ते यांच्या देखभाल दुरुस्सीपीआरमध्ये स्वतंत्र कॅन्सर सेंटर सुरू करा : आमदार जयश्री जाधव 

 विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे वेधले लक्ष : ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण आवश्‍यकच 

कोल्‍हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे अद्यावत स्वतंत्र कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. 

सीपीआर रुग्णालय कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यासह कर्नाटकातील हजारो लोकांसाठी आधारवड आहे. सीपीआरमधील समस्या आणि कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटरच्या मागणीकडे आमदार जयश्री चंद्रकांत (अण्णा) जाधव यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्नद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘सीपीआर’ म्हणजे थोरला दवाखाना. हे रुग्णालय सर्वसामान्यांचे आधारवड आहे. या रुग्णालयात नेमक्या काय समस्या आहेत, त्रुटी काय आहेत आणि कोणत्या उपाययोजनांवर भर द्यायला हवा याकडे आज सभागृहाचे लक्ष वेधले.
सीपीआरमध्ये कॅन्सरची प्राथमिक तपासणी होते. पण पुढील तपासणी करता सुसज्ज अशी प्रयोगशाळा नाही. तसेच कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट पेशंटला लागणारे औषधे मोफत किंवा सवलतीच्या दरात देण्याची सुविधा उपलब्ध नाही. या रुग्णांच्यावर उपचार साठी स्वतंत्र सेंटर  नसल्यामुळे सर्वमान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाया जातो. तसेच काही  गोरगरीब रुग्णांना वेळ व पैसा अभावी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमावा लागला आहे. केवळ पैसा नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांचा जीव जाणे हे मनाला त्रासदायक देणार आहे. यामुळे मुंबई, नागपूर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरमध्ये स्वतंत्र असे कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विधानसभेत केले आहे केल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. सीपीआरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर सुरू झाल्यास, त्यासाठी लागणारी मशिनरी देण्याचे आश्वासन रोटरी क्लबने दिल्याचेही यावेळी आमदार जाधव यांनी सांगितले.
सीपीआर मधील ब्लड बँकची गाडी खराब आहे, वर्ग चार  वॉर्ड बॉयची पद रिक्त आहेत, अपघात विभागाची विस्तारीकरण नाही, शेंडा पार्क येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे, एमआरआय मशीनची मागणी प्रलंबित आहे. तसेच सीपीआर येथील इमारत व रस्ते यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 38 कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. या सर्व मागण्याकडे आमदार जयश्री जाधव यांनी शासनाचे लक्ष वेधले आणि या सर्व मागण्यांना त्वरित मंजुरी देऊन निधी द्यावा आणि ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण करावे अशी मागणी आमदार जाधव यांनी विधानसभेत केली आहे.तीसाठी सुमारे 38 कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. या सर्व मागण्याकडे आमदार जयश्री जाधव यांनी शासनाचे लक्ष वेधले आणि या सर्व मागण्यांना त्वरित मंजुरी देऊन निधी द्यावा आणि ‘सीपीआर’ रुग्णालयाचे सक्षमीकरण करावे अशी मागणी आमदार जाधव यांनी विधानसभेत केली आहे.