बातम्या

ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा - नितेश राणे

Start making Maharashtra drug free from Matoshree  Nitesh Rane


By nisha patil - 4/11/2023 8:30:01 PM
Share This News:



उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षावर येऊन राहायचा; ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केला गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आता भाजप आमदाराने उत्तर दिलं आहे. ड्रगमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा. दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. बीएमसीचं टेंडर कोणाला द्यायचं ते सांगावं लागेल. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं म्हणत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे


ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा - नितेश राणे