बातम्या

तारदाळ ते शहापूर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

Start of concreting of Tardal to Shahapur main road


By nisha patil - 10/14/2024 9:20:12 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे २ कोटी २० लाखांच्या निधीतून तारदाळ ते शहापूर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि गटर्सचे काम सुरू करण्यात आले. या कामाचा शुभारंभ डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते झाला.

समारंभात उपस्थित नागरिकांनी साहेबांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी तारदाळ गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 


तारदाळ ते शहापूर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ