बातम्या

चहाऐवजी कोमट पाण्याने करा तुमच्या दिवसाची सुरूवात, मिळतील अनोखे फायदे

Start your day with warm water instead of tea for unique benefits


By nisha patil - 7/31/2023 7:37:53 AM
Share This News:



आपल्यापैकी बहुतांश लोक हे सकाळी उठल्यावर कपभर चहा किंवा कॉफी पिणं पसतं करतात. त्याशिवाय बऱ्याच जणांना फ्रेश वाटत नाही. पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसेसचा (gases) त्रास होतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

त्याऐवजी तुम्ही सकाळी उठल्यावर आधी थोड कोमट (warm water in morning) पाणी पिऊ शकता. शतकानुशतके आपली वडीलधारी मंडळीदेखील सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पितात. सकाळी रिकाम्या पोटी कोमट किंवा गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात.

कोमट पाणी पिण्याचे फायदे

विषारी पदार्थ पडतात बाहेर

जर तुम्ही रोज सकाळी उठल्यालर लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब टाकून कोमट पाणी प्यायलात तर त्यामुळे शरीरातील टॉक्सिक किंवा विषारी घटक बाहेर पडतात. कोमट पाणी प्यायाल्याने शरीराचे तापमानही वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिझमचा दरही वाढतो.

वजन कमी करण्यास फायदेशीर

जर तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचे असेल तर रोज कोमट पाण्यात जिरे टाकून ते पाणी प्यावे. यामुळे लवकरच तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

पचन चांगले होते

तुम्हाला जर पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील तर रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. रात्री जेवल्यानंतर आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाण्याचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

हायड्रेटेड राहता

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ती व्य्कती लवकर आजारी पडत नाही.

सर्दी-खोकल्यात ठरते उपयोगी

रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. तसेच इम्यिुनिटीही वाढते.

त्वचेसाठी ठरते फायदेशीर

रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायची सवय असेल तर त्यामुळे त्वचा चमकदार होते. त्वचेवर नैसर्गिक चमक हवी असेल तर रोज पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, तसेच पिंपल्स आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून सुटका मिळते.


चहाऐवजी कोमट पाण्याने करा तुमच्या दिवसाची सुरूवात, मिळतील अनोखे फायदे