बातम्या

राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

State Cultural Award distribution ceremony concluded


By nisha patil - 2/15/2024 5:32:11 PM
Share This News:



मुंबई : महाराष्ट्र शासन राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय मुंबई येथे दिमाखात पार पाडला. 

कोकणातील दशावतार ते झाडीपट्टीतील कलात्मक विविधतेने नटलेल्या हरेक क्षेत्रातील नामवंत कलाकारांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यात कोल्हापुरातील शाहिरी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा व एक वेगळाच  ठसा उमटवलेची नोंद घेत शासनाने प्रथमच करवीर नगरीची नोंद घेत महाराष्ट्र राज्याचे  सांस्कृतिक व वनमंत्री  सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते शाहीर राजू राऊत यांचा सपत्नीक  सत्कार करुन २०२३ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी  सांस्कृतिक विभागाचे संचालक विकास खारगे,बिभिषण चौरे व श्रीराम पांडे उपस्थित होते.


राज्य सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न