बातम्या

राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय

State Level Poster Presentation Competition DY Patil College of Pharmacy


By nisha patil - 4/4/2024 8:51:21 PM
Share This News:



अशोकराव माने कॉलेज ऑफ फर्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी श्वेता उबाळे व अस्मिता पिसाळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
 
सावे येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये २० महाविद्यालयांचा सहभाग होता.  या स्पर्धेत  डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या चार विद्यार्थ्यांनी सहभागी होत ‘सेल्फ मेडीकेशन -सेफ्टी इश्यू’ या विषयावर पोस्टर प्रेझेन्टेशन केले. यामध्ये श्वेता व अस्मिता यांच्या सादरीकरणाला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाच्या गौरव गवस व साक्षी बागणे  या विद्यार्थ्यांनीही उत्तम सादरीकरण केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य  डॉ.चंद्रप्रभू जंगमे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जंगमे म्हणाले,  ‘भारत देशात औषध उद्योगाची प्रचंड वेगाने प्रगती होत असून जगात आपण अव्वलस्थानी आहोत. आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) हे आव्हानात्मक करिअर म्हणून उदयास आलेले आहे. अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच औषधांचाही ह्या मूलभूत गरजेमध्ये समावेश करावयाला हवा आहे. औषधाविना आपण आधुनिक जगाची कल्पनादेखील करू शकणार नाही’

 या विद्यार्थ्यांना डॉ. अभिनंदन पाटील, प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


राज्यस्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय