बातम्या
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 11/7/2024 3:42:27 PM
Share This News:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन अर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, याचा शहरातील लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने लाडकी बहीण योजनेसह मतदार नोंदणी शिबिराचे उद्घाटन आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते खोलखंडोबा हॉल, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे करण्यात आले. आजच्या या पहिल्याच शिबिरास शनिवार पेठ परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घेतले जातील. ज्या महिलांकडे बँक खाते नाही, अशा महिलांना जागेवरच पोस्ट खाते सुरु करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच नव मतदारांनी मतदान नोंदणी करावी, असे आवाहन केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन
|