ताज्या बातम्या

एचएमपीव्ही व जीबीएस रोखण्यासाठी राज्य सरकारची उपाययोजना

State government measures to prevent HMPV and GBS


By nisha patil - 11/3/2025 11:13:25 PM
Share This News:



एचएमपीव्ही व जीबीएस रोखण्यासाठी राज्य सरकारची उपाययोजना

मुंबई, दि. ११ : राज्यातील संसर्गजन्य एचएमपीव्ही (HMPV) आणि गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यस्तरीय ‘शीघ्र प्रतिसाद पथक’ कार्यरत केले असून बाधित भागातील पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच, सर्व जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुणे, सोलापूर, नांदेड आदी जिल्ह्यांत GBS रुग्ण आढळले असून, पुण्यात एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळे जलस्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.


एचएमपीव्ही व जीबीएस रोखण्यासाठी राज्य सरकारची उपाययोजना
Total Views: 61