बातम्या

शेतकऱ्यांकडं राज्य सरकारचं दुर्लक्ष, किसान सभेचा हल्लाबोल

State governments neglect of farmers


By nisha patil - 11/6/2024 8:07:15 PM
Share This News:



सध्या राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप  तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नसल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले  यांनी व्यक्त केलं आहे. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात, तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असल्याचे नवले म्हणाले. मात्र, खरीप हंगामाच्या तयारीबाबत राज्य सरकारचं दुर्लक्ष असल्याचे नवले म्हणाले. 
 

राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर  लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, कर्ज, पीक विमा, पर्जन्यमान, जलसाठ्यांची स्थिती, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, गोदामे, बाजार सुविधा अशा संबंधित सर्व बाबींचे गांभीर्याने नियोजन होणे अपेक्षित असते. मात्र निवडणुकांच्या माहोलमधून राज्यकर्ते अजूनही बाहेर यायला तयार नसल्याने याबाबत केवळ कागदी घोडे नाचविले गेले आहेत. खरीप हंगामच त्यामुळे धोक्यात आला असल्याचे नवले म्हणाले.


शेतकऱ्यांकडं राज्य सरकारचं दुर्लक्ष, किसान सभेचा हल्लाबोल