बातम्या

कोल्हापूरात घिसाडी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

State level convention of Ghisadi community in Kolhapur


By nisha patil - 2/26/2024 5:37:27 PM
Share This News:



जन्मभूमी राजस्थानी असली तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे - 

कोल्हापूरात घिसाडी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

 

श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेसअभिवादन. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा मिटींग घेत आहोत. आदरणिय  दत्ता आण्णा सुर्यवंशी,आर.के.पवार, महानगरपालिका दत्ता आण्णा पवार (मेढेकर) नगरसेवक  दिलीप पवार  - नगरसेवक   आर.के.पवार माजी महापौर, माजी. नगरसेवक दिलीप पवार,माजी. नगरसेवक रमेश पोवार,दत्ता मामा सुर्यवंशी, महिन्द्र सुर्यवंशी, आजय चव्हाण, युवराज पवार, कोल्हापूर येथे समाजाचे एक नांव असणे या आढावा मिटींग मध्ये  विषयावर चर्चा केली. ते १० वर्षे सातारा समाजाचे कार्यकर्ते राज्यस्तरीय मिटींग मेळावे, आंदोलने, मोर्चा, चर्चासत्र व पत्रक काढून मांडली.  समाजाच्या लेटर पॅडवर चितोडीया रजपूत, समाजाच्यावतीने जेंव्हा एखादे निवेदन जेंव्हा देतो ते निवेदन मा.जिल्हाधिकारी, मा.पालकमंत्री, मा.समाज कल्याणमंत्री, यांना देत असतांना नकळत त्या तिन जातींचा प्रसिध्दी व प्रचार करीत असतो. आपण हे तीन जात आपल्या लेटर पॅडवर

टाकत असतांना तिन्ही जातीला आपण विचारात घेत नाही. मग आपण त्यांचा उल्लेख का करत असतो ? या लोहार समाजाने आपल्या समाजाच्या लेटरपॅडवर आपण आमचे नांव कोणाला विचारुन टाकत आहात.आपण प्राचीन इतिहासामध्ये न शिरता देश स्वतंत्र होवून ७६ वर्षे होत आहेत भविष्य काळात निवडणूका असो, शाळेचा दाखला असो, आधार कार्ड असो, ओळखपत्र असो,  नॉन क्रिमीनल दाखला असो, नोकर भरती असो एवढेच काय मुलगी किंवा मुलगा यांचा जन्म झाल्यावर आपण त्यांची जात हिंदू-घिसाडी या नावानेच रजिस्टर मध्ये नोंद करतो. महाराष्ट्रामध्ये आपल्या समाज बांधवांचा आपला हिंदू घिसाडी या नावाने जातीचा दाखला ९० ते ९५ टक्के याच नावाने काढला जातो. आपल्या पुर्वजांची जन्मभुमी राजस्थान असली तरी आपली कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे हे आपल्याला विसरुन चालणार नाही.

 महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये गेली १० ते १५ वर्षामध्ये समाज मिटींगद्वारे, मेळाव्याद्वारे उपोषणाद्वारे, मोर्चा ओबीसी, आररक्षण इ. विषय घेवून जागरुक होत आहे ही चांगली गोष्ट आहे. वरील मान्यवरांच्या व आपल्या सुज्ञ समाज बांधवांच्या परमेश्वर कृपेने महाराष्ट्रातील समाज बांधव जर संघटीत झाले. तर एकाच नांवाने राज्यस्तरीय संघटनेचे नांव ठेवता येईल व ते नांव महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये ठेवले पाहिजे हा ठराव घेतला जाईल. आपण संघटित नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत ते इतर समाज घेताना दिसत आहेत. आपण संघटित झालो तर या योजना आपल्या समाज
 

बांधवांसाठी व नव्या येणाऱ्या पिढयांसाठी घेता येईल व राज्य सरकार आपल्या समाजाची नोंद घेईल, आपल्या समाजाची जनगणना ठरवता येईल, आपण दिलेल्या निवेदनांचा सरकार विचार करील, आपण आपल्या मध्ये या चार जातींवरुन वाद विवाद समज गैरसमज करत बसण्यापेक्षा त्याचा फायदा इतर जातीची लोक घेतात वरील मान्यवरांना एवढीच विनंती आहे की, आपल्या जातीची टक्केवारी पाहता किंवा पाहिल्यास जास्तीत जास्त जातीचे दाखले हिंदू घिसाडी या नावाने आहेत. तरी वरिष्ठांना नम्रपणे एकच विनंती आहे की, संघटनेचे नांव ठेवतांना मनापासून याचा विचार जरुर करावा, राज्य संघटनेमध्ये प्रत्येक जिल्हयातील एक सदस्य असावा.


कोल्हापूरात घिसाडी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन