बातम्या

निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

State transport services on some routes are likely to be disrupted due to election activities


By nisha patil - 7/5/2024 7:26:34 AM
Share This News:



सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी दिनांक 6 मे 2024 रोजी मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना सोडण्यासाठी व दिनांक 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरुन निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत मतदार संघनिहाय एकूण 435 बसेस पुरविण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन कोल्हापूर विभागाकडे 741 इतक्या बसेस उपलब्ध असून त्यापैकी 435 बसेस निवडणूक कामकाजाकरिता पुरविण्यात आल्यामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तरी प्रवासी जनतेने होणारी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचे नियोजन करुन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

पुढील मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोतोली, इचलकरंजी, कणकवली , रत्नागिरी व बेळगाव

संभाजीनगर आगारातून सुटणाऱ्या गाड्या- बाजार भोगाव, भोगावती व हुपरी

इचलकरंजी आगारातून सुटणाऱ्या गाड्या- नृसिंहवाडी, खिद्रापूर, कोल्हापूर  व मिरज

गारगोटी आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व गडहिंग्लज

मलकापूर आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व कोकरुड

चंदगड आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोवाड, राजगोळी, कोलीक, पारगड, तिलारी, कोल्हापूर व बेळगाव

कुरुंदवाड आगारातून सुटणाऱ्या गाड्या- पुणे, सांगली, कागवाड, नृसिंहवाडी, इचलकरंजी व हुपरी

कागल आगारातून सुटणाऱ्या गाड्या- पुणे, मुंबई, म्हसवड, जमखंडी, बिद्री, अर्जुनवाड, बोळावी, मिरज, इचलकरंजी, रंकाळा, निपाणी व सुळकूड

राधानगरी आगारातून सुटणाऱ्या गाड्या- कोल्हापूर व निपाणी

गगनबावडा आगारातून सुटणाऱ्या गाड्या- सातारा  व पुणे

आजरा आगारातून सुटणाऱ्या गाड्या- गडहिंग्लज, आंबोली, चंदगड व बेळगाव याप्रमाणे


निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन