बातम्या

गोकुळ शिरगाव ग्रामस्थांचे विविध प्रश्नां संबंधी ग्रामपंचायतीला निवेदन

Statement of Gokul Shirgaon Villagers to Gram Panchayat regarding various issues


By nisha patil - 9/2/2024 12:41:23 PM
Share This News:



गोकुळ शिरगाव ( प्रतिनिधी ) :  गोकुळ शिरगाव कागले माळ येथील रहिवाशांच्या वतीने गटारी ,रस्ते पाणी हे प्रलंबित प्रश्न ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गोकुळ शिरगाव कागले माळ येथील रहिवाशांनी 20 वर्षापासून ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी व तोंडी सांगून कागले माळावर गटारी करण्यास सुरवात होत नाही.चुन्नामट्टी ते भारती पाटील इथेपर्यंत पाणंद रस्ता ग्रामपंचायत नोंद असून तो रस्ता सध्या बंद असून तो रस्ता खुला करून मिळावा.कागलेमाळवाडी येथील गटार व रस्ता पाणी पाईप लाईन जो पर्यंत होत नाही तोपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी भरली जाणार नाही.सध्या चालू असणा-या एम.आय.डी.सी. ते गजानन पाटील रस्ता व पुलाचे काम थांबवून त्यांचे बजेट रस्ते व गटारीसाठी वापरावे व चालू असणारे काम थांबवावे. 

निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्यास सर्व ग्रामस्थ व रहिवाश्यांच्या वतीन सोमवार दिं.12 फेब्रुवारीपासून  ग्रामपंचायत परिसरात उपोषन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


गोकुळ शिरगाव ग्रामस्थांचे विविध प्रश्नां संबंधी ग्रामपंचायतीला निवेदन