बातम्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे दत्त दालमिया कारखाना प्रशासनाला निवेदन...
By nisha patil - 11/27/2023 5:38:27 PM
Share This News:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दत्त दालमिया कारखाना प्रशासनाला निवेदन दिले आहे मागील हंगामातील पन्नास रुपये सह चालू हंगामातील उसाचा दर एफ आर पी शंभर रुपये जाहीर करावा अन्यथा शुक्रवारपासून ऊस वाहतूक रोखण्यासाठी कारखाने बंद करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे
पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यांने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार मागील हंगामातील उसाचे 50 रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला प्रतिटन एफआरपी प्लस 100 रुपये दर जाहीर करावा अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलीय..याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे दत्त दालमिया प्रशासनाला देण्यात आलं..दरम्यान दालमिया प्रशासनाने बुधवार पर्यंत सकारात्मक निर्णय जाहीर करावा अन्यथा शुक्रवार पासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बंद करुन ऊस वाहतूक रोखण्यासह कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल..असा इशारा यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना प्रशासनाला दिलाय..
स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे दत्त दालमिया कारखाना प्रशासनाला निवेदन...
|