बातम्या
शाहू स्टेडियमबाबत जिल्हाधिकारी येडगेंना मागण्यांचे निवेदन
By nisha patil - 10/1/2025 2:48:04 PM
Share This News:
शाहू स्टेडियमबाबत जिल्हाधिकारी येडगेंना मागण्यांचे निवेदन
शाहू स्टेडियममध्ये सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन : रविकिरण इंगवले
शाहू स्टेडियम हे खेळाडूंचे उगमस्थान आहे. कोल्हापूरकरांनी या जिल्ह्याला व राज्याला अनेक नामवंत खेळाडू दिलेत. त्यात शाहू स्टेडियमची दुरवस्था झालीय. तिथे योग्य त्या सुविधा करा, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
Vo - कोल्हापुरातील खेळांना चालना देणारं व फुटबॉलचे बरेच खेळाडू तयार करणाऱ्या शाहू स्टेडियममध्ये सुविधा उपलब्ध नाहीत. तेथे योग्य त्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय. शाहू स्टेडियम हे खेळाडूंचे उगमस्थान असुन फुटबॉल सामन्यांचे आयोजन करणारी के. एस. ए. संस्था यासाठी तिकीट घेते, पण यातून प्रेक्षकांना सुविधा मिळत नाहीत. शाहू स्टेडियमची दुरवस्था झाल्याची पाहायला मिळतेय. सामने बघायला येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. स्टेडियममध्ये स्वच्छतागृहे नाहीत. स्टेडियम गॅलरीमध्ये कचरा उठाव केला जात नाही. प्रेक्षकांना गॅलरीमध्ये ऊन, पावसामध्ये सामने बघावे लागतात. तसेच पार्किंगचे नियोजन नाही. या सर्व समस्यांचे तत्काळ नियोजन करावे व फुटबॉलप्रेमींना यातून तत्काळ दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इंगवलेंनी दिलाय. यावेळी सुनील मोदी व पदाधिकारी उपस्थित होते.
शाहू स्टेडियमबाबत जिल्हाधिकारी येडगेंना मागण्यांचे निवेदन
|