राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापूर संदर्भातील महत्त्वाच्या मागण्यांची निवेदन

Statement of important demands regarding Kolhapur to Chief Minister Devendra Fadnavis


By nisha patil - 2/14/2025 11:32:11 AM
Share This News:



मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन कोल्हापूर संदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर निवेदन दिले.यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला एक्सप्रेस फिडर वीज वाहिनीतून अखंडित पुरवठा होण्यासाठी निधी देण्याच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ठरावाला मान्यता देण्याची अग्रक्रमाने विनंती केली.
 

कोल्हापूरकरांना अखंडित पाणीपुरवठा मिळण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पटवून दिले. त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शाहू मिल परिसरात उभारण्यासाठी शाहू मिलची जागा कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग करणे अत्यावश्यक आहे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

सेच कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.या तीनही मागण्यांसंदर्भात सकारात्मकपणे विचार करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोल्हापूर संदर्भातील महत्त्वाच्या मागण्यांची निवेदन
Total Views: 60