बातम्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
By nisha patil - 7/22/2023 11:05:57 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा व शहरांमधील खाजगी रुग्णालयाची व त्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरील रुग्णही उपचार घेतात .सर्वांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाहीत. किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे एक मोठे सरकारी रुग्णालय सोडले तर दुसरे रुग्णालय नाही त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. खाजगी रुग्णालय आपली मनमानी करून भरमसाठ बिले रुग्णांना देतात. गरजेपेक्षा जास्त औषध लिहून कोणत्या ना कोणत्या टेस्ट करायला लावणे, डॉक्टर चार्जेस, सरकारी योजनेचा फायदा न देणे अशा अनेक बाबी यामुळे रुग्ण व नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग कोल्हापूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणारे रुग्ण व नातेवाईक यांना तेथील दर व शासनाने नेमून दिलेले दर, रुग्णांचे अधिकार, शासनाच्या वैद्यकीय योजना चा फलक रुग्णालयामध्ये दर्शनी भागात लावावा. असे आदेश सर्व खाजगी रुग्णालयाला द्यावेत तसेच जे कोणी रुग्णालयात असे फलक लावणार नाहीत त्याचे परवाने द चार्टर ऑफ पेशंट राइट्स या कायद्याद्वारे रद्द करावेत असे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. साने गुरुजी वसाहत येथे दोन दिवसापूर्वी रोडवर स्पीड बेकर वरून गाडी घसरून अपघातात मालिकेचा मृत्यू झाला त्याला महानगरपालिका व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महानगर संघटक उत्तम वंदुरे , राहुल ढवळे अभिजीत राऊत प्रसाद साळुंखे,अमित साळुंखे, संतोष खटावकर अजिंक्य शिंदे राहुल नाईक तेजस कुपवाडे उपस्थित होते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
|