बातम्या
राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद दि.२५ जून रोजी कोल्हापुरात : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती
By nisha patil - 6/17/2024 8:25:53 PM
Share This News:
संयुक्त राष्ट्रसंघाने विकासाला शाश्वत करण्यासाठी १७ उद्दिष्ट सुचवली आहेत. ही उद्दिष्टे सर्वसामान्य पर्यंत पोहोचल्यानंतरच विकासाला शाश्वततेचे रूप प्राप्त होईल व विकास हा सर्वांगीण व सर्वांना लाभदायी असा ठरू शकेल याच हेतूने राज्य शासनाने मित्रा संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला बळकटी मिळत आहे.
राज्यातील उद्योजक, बिल्डर्स, बार असोसिएशन, डॉक्टरांच्या संघटना तसेच शिक्षक प्राध्यापक शास्त्रज्ञ शेतकरी व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे तज्ञ व अभ्यासक या सर्वांसोबत शाश्वत विकासाबाबत विचार विमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्यासाठी राज्यातील पहिलीच शाश्वत विकास परिषद दि.२५ जून रोजी कोल्हापुरात पार पडणार असल्याची माहिती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.परिषदेचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविता येते याची चाचपणी करणे गरजेचे आहे. यासह रोजगार विषयक कर्ज योजनांना गती देण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला वाव आहे. यासह धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटन स्थळे, पर्यटन केंद्रांच्या माध्यमावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने उद्धिष्ठपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना दिल्या
राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद दि.२५ जून रोजी कोल्हापुरात : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती
|