बातम्या

हलासनामुळे सदैव रहा तरुण

Stay young forever with Halasana


By nisha patil - 9/26/2023 7:26:46 AM
Share This News:



कृती: आधी पाठिवरती झोपावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडावेत. दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून कमरेला जुळवून ठेवावेत.
आता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अधिक त्रास होत असेल तर, अशा वेळी दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा. 
 
आपल्या कार्यशक्तीनुसारच हा व्यायाम वाढवावा. अन्यथा मानेला त्रास होण्याची शक्यता आहे. सूचना : मानेचा किंवा पाठीच्या मणक्याचा विकार असलेल्यांनी हा व्यायाम करणे टाळावे. ज्यांना गळ्याचा गंभीर आजार आहे अशा रुग्णांनीही हे आसन करणे टाळावे.


हलासनामुळे सदैव रहा तरुण