बातम्या
पाणी पिण्या इतकंच गरजेचं आहे उन्हात राहणं, फायदे इतके जे माहितही नसतील!
By nisha patil - 2/1/2024 7:26:48 AM
Share This News:
सामान्यपणे सगळ्या लोकांना हेच वाटतं की, उन्हात थांबल्याने त्वचा काळी पडते. कारण जेव्हा थेट सूर्याची किरणं त्वचेवर पडतात, तेव्हा सनबर्न होऊ शकतं. यापासून वाचवण्यासाठी लोक सूर्य प्रकाशाला टाळतात.
पण त्वचा निरोगी ठेवण्यासोबतच शरीर निरोगी ठेवणंही गरजेचं आहे. मानवी शरीराला पोषक तत्वांसोबतच अनेक व्हिटॅमिन्सची गरज पडते. ज्यातील एक महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन डी.
उन्हात राहणं गरजेचं
आपलं शरीर फार जास्त व्हिटॅमिन डी चं उत्पादन करू शकत नाही. डॉक्टर्स रोज 20-30 मिनिटे उन्हात राहण्याचा सल्ला देतात. NIH नुसार, जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी आपण सूर्याच्या किरणांमधून मिळवू शकतो. सूर्याची किरणं शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतात. यांच्यामुळे केवळ शरीरच नाही तर मानसिक समस्याही दूर होतात. जर तुम्हीही अनेक महिन्यांपासून सूर्य पाहिला नसेल तर जाणून घ्या उन्हात राहिल्याने शरीरात राहण्याचे फायदे.
तणाव होतो कमी
सकाळच्या सौम्य उन्हात थोडा वेळ बसल्याने शरीरात मेलाटोनिनला नियंत्रित करण्यास मदत मिळते. यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते. असं सांगितलं जातं की, तणाव दूर करण्यासाठी उन्हात बसणं बेस्ट उपाय आहे. हे गरजेचं नाही की तुम्ही उन्हात कधी बसावं किंवा उभे रहावं. तुम्ही चालू-फिरू शकता, खेळू शकता. यामुळे तुमचा तणाव कमी होईल.
इम्यूनिटी बूस्ट होईल
फार कमी लोकांना माहीत आहे की, उन्हामुळे आपली इम्यूनिटी बूस्ट होते. सूर्याच्या किरणांमध्ये राहिल्यास आपण फार कमी वेळात इम्यूनिटी मजबूत करू शकतो. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.
हाडे मजबूत होतील
ठिसूळ झालेली हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शिअमसोबतच व्हिटॅमिन डी ची मुख्य भूमिका आहे. सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून तुम्ही व्हिटॅमिन भरपूर मिळवू शकता. जर 15 मिनिटे उन्हात राहून व्यायाम केला तर हाडे मजबूत होतील. डॉक्टर्सही हिवाळ्यात जास्त उन्ह घेण्याचा सल्ला देतात.
झोपेत सुधारणा
एका रिसर्चनुसार, जर सकाळी 1 तासही तुम्ही उन्हात थांबले तर रात्री तुम्हाला चांगली झोप लागेल. यामागे एक साधं लॉजिक आहे. तुम्ही जेवढे जास्त उन्हात रहाल, झोपताना तुमच्या शरीरात तेवढं जास्त मेलाटोनिन उत्पादन होईल. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
वजन कंट्रोल होईल
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सूर्य प्रकाश आणि बीएमआयमध्ये खोलवर संबंध आहे. उन्हात राहिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. ज्यामुळे वजन वेगाने कमी होतं. हिवाळ्यात कमीत कमी 15 मिनिटे उन्हात राहिल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास खूप मदत मिळेल.
पाणी पिण्या इतकंच गरजेचं आहे उन्हात राहणं, फायदे इतके जे माहितही नसतील!
|