बातम्या

गरज असेल तरच घराबाहेर पडा, पर्यटनस्थळी जाणे टाळा: आमदार सतेज पाटील यांचे जिल्हावासीयांना आवाहन

Step out only if necessary Avoid going to tourist spots


By nisha patil - 7/24/2024 11:09:03 PM
Share This News:



गरज असेल तरच घराबाहेर पडा, पर्यटनस्थळी जाणे टाळा:
आमदार सतेज पाटील यांचे जिल्हावासीयांना आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन, तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी पातळ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे संभाव्य पूर्व परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

भारतीय हवामान वेधशाळेने येणाऱ्या दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी सर्व कोल्हापूरकरांना विनंती केली आहे, की अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडावे, पर्यटन स्थळी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      कोल्हापूर जिल्ह्यात काही सकल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे प्रशासनाने दिलेल्या सूचनांची पालन करावे असेही आमदार पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे. याचबरोबर पूर परिस्थितीत कोणतीही मदत हवी असल्यास तात्काळ संपर्क करावा यासाठी स्वतःचा मोबाईल नंबरसह आमदार ऋतुराज पाटील आमदार श्रीमती जयश्री जाधव आणि अजिंक्यतारा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील
9823012905

आमदार ऋतुराज पाटील
9764495999

आमदार श्रीमती जयश्री जाधव
9552073100

अजिंक्यतारा कार्यालय
02312653288/89/90


गरज असेल तरच घराबाहेर पडा, पर्यटनस्थळी जाणे टाळा: आमदार सतेज पाटील यांचे जिल्हावासीयांना आवाहन