बातम्या

पन्हाळगडावर नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांच्या आरोग्याची छेडछाड.

Stinky tap water at Panhalgad


By nisha patil - 4/22/2024 3:20:58 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी, शहाबाज मुजावर.गेले आठ,दहा दिवस पन्हाळा  नाक्या पासून ते एच.पी. गॅस वार्ड (क्रमांक 8)  पर्यंत सर्वच्या घरगुती पाणी  कनेक्शन मध्ये दुर्गंधी युक्त आळी.किड्यांचे काळे पाणी येत आहे. गेले आठ दिवस  हा प्रकार चालू आहे.याची कल्पना नगरपरिषद अधीक्षक अमित माने यांना. मुबारक मुतवली यांनी  दिली होती. तसेच जो चेंबर मुजला आहे.तो दुरुस्ती करण्यासाठी  वारंवार तक्रारी दिल्या गेल्या आहेत.परंतु त्यांनी काहीही उपाययोजना केलेला दिसून आल्या नाहीत. त्यामुळे आज पुन्हा एकदा नळाला दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना पिण्यासाठी येत आहे. आधीच उन्हाचा तडका वाढला आहे. त्यात अशा प्रकारचे पाणी येथील स्थानिक लोकांना पिण्यास दिल्यास त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. यावर योग्य तो आज निर्णय न झाल्यास तेच पाणी पन्हाळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना पाजवण्यात येईल असे स्थानिक नागरिकांचे  कडून सांगण्यात आले मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
             

 राजू मुल्ला यांनी ही योजना चालू झाल्यापासून एकदा ही पाईपलाईन वॉश आउट केली नाही आहे.किंवा बदलली नाही आहे. त्यामुळेच यामध्ये काहीतरी प्राणी जाऊन मृत होऊन सडले आहे. हेच पाणी लोकांना येत आहे. असे त्यांनी आपल्या माध्यमाला माहिती देताना सांगितले.
       

  तसेच पन्हाळगडावरील पाणी हे एक दिवस आड येते बिल घेताना एक महिन्याची घेतले जाते.तसेच काही ठिकाणी हे पाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी जास्त दाबाने येते अशा पिण्याच्या पाण्याबाबत समस्यांना नागरिक त्रस्त झाले. आहेत.आज या ठिकाणी तक्रारी नगरपरिषद च्या कर्मचारीच्या समोर येत होत्या.
           

आज नागरिकांनी  नगरपरिषदे च्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले. सुहास भोसले, विश्वास रामाने, पोपट मोरे, सागर कुराडे हे कर्मचारी पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी आज नागरिकांना आश्वासन दिले की  आजच्या आज  ही सर्व पाईप लाईन वॉश आउट करून घेतो. व काही घाण अडकल्यास काढून दिले जाईल याची लोकांना हमी दिली.


पन्हाळगडावर नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांच्या आरोग्याची छेडछाड.