बातम्या
कोतोली - कोल्हापूर रास्ता रोको
By nisha patil - 11/1/2024 6:36:02 PM
Share This News:
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्याबद्दल भाजप व विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्यातरी दबावापोटी, किंवा हुकूमशाही असे अनेक कारणाने या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाला ही कमी दाखवले आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आहे, त्या घटनेची ही पायमल्ली केली गेली आहे. या लोकशाहीची हत्या केली आहे याचा निषेध जेवढा करेल तेवढा कमी आहे. या पापेला यावेळी महाविकास आघाडीच्या तर्फे कोतोली रास्ता रोको करून नार्वेकर याच्या यांच्या प्रतिकाआत्मक पुतळ्याचे दहन करून निशेदार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी सज्नन पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटिल बाजीराव पाटील,स्वप्निल जाधव,संभाजी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोतोली - कोल्हापूर रास्ता रोको
|