बातम्या
दाखल्यांसाठी होणारी सर्व सामान्यांची परवड थांबवून दाखले त्वरित द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
By nisha patil - 6/21/2024 6:38:29 PM
Share This News:
कोल्हापूर दि.२१ भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन शासकीय दाखले मिळण्यासाठी होणारा विलंब याविषयावर निवेदन सादर करण्यात आले.
जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात या कालावधीत पहिलीपासून ते उच्च शिक्षणाच्या संदर्भात पालकांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलीयर, उत्पन्न दाखले इत्यादी दाखल्यांची आवश्यकता लागते. या दाखल्यांच्या आधारेच पुढील शैक्षणिक प्रकिया अवलंबून असते. परंतु हे दाखले मिळण्यासाठी या कालावधीत शासकीय कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना फेऱ्या घालाव्या लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय व्यवस्थे ज्या अधिकाऱ्यांकडे दाखले देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर अन्य कामांची अतिरिक्त जबाबदारी देखील आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे दाखले मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत आहे. याउलट अशा प्रकारचे काम करणा-या खाजगी एजंट मार्फत या सुविधा तात्काळ होताना दिसतात. विशेष सहाय्य योजनेच्या दाखल्यांना 6 महिन्याचा विलंब लागत आहे. अशा सर्व व्यवस्थेमुळे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
या निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी करण्यात आली की, चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने, दाखले लवकर मिळण्यासाठी एक सक्षम अधिकारी नियुक्त करावा त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॅम्प आयोजित करण्यात यावेत अशी मागणी केली.
शिष्टमंडळाच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी लवकरच शहरात विविध ठिकाणी कॅम्प घेण्यात येईल असे आश्वस्त केले.
याप्रसंगी रविकिरण गवळी, अप्पा लाड, विशाल शिराळकर, रुपारानी निकम, राजू मोरे, अवधूत भाट्ये, सयाजी आळवेकर, दिलीप बोंद्रे, अशोक लोहार, जय गवळी, योगेश साळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दाखल्यांसाठी होणारी सर्व सामान्यांची परवड थांबवून दाखले त्वरित द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
|