विशेष बातम्या
गळती थांबवा, मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या – आमदार सतेज पाटील
By nisha patil - 2/27/2025 9:34:33 PM
Share This News:
गळती थांबवा, मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या – आमदार सतेज पाटील
कोल्हापूर – महावितरणची वीज चोरी आणि गळती वाढून १८% झाली असून, तब्बल १५,००० कोटी रुपये वाया जात आहेत. गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी ग्राहकांवर बोजा टाकणे अयोग्य आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
महावितरणच्या वीजदरवाढ प्रस्तावावरील सुनावणी दरम्यान, आ. पाटील यांनी वाढीव दरांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरणच्या अकार्यक्षमतेवर टीका केली.
त्यांनी सोलर वीज निर्मिती वाढूनही दर कमी का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, औद्योगिक क्षेत्रावर टीओडीसारख्या अटी लादून उद्योगधंदे कमी करण्याचा डाव आखला जात आहे का, असा सवाल केला.
गळती थांबवा, मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या – आमदार सतेज पाटील
|