बातम्या
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गांजाचा सुळसुळाट रोखा
By nisha patil - 12/8/2023 5:30:45 PM
Share This News:
कोल्हापूर शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत करावाई करा
कोल्हापूर युवासेना ठाकरे गटाची मागणी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गांजा विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोकांतर्गत कारवाई करा अशी मागणी युवासेना शहर व जिल्हा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत निवेदन युवासेना जिल्हाधिकारी मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मनजीत माने यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गांजा विक्रीचा सुळसुळाट आहे. हा गांजा कर्नाटक आणि सांगली इथून आयात केला जातोय या गांजामुळे आजची तरुण पिढी बरबाद होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे कोल्हापूर शहरातील अनुक्रमिनी मंदिर रंकाळा पेटाळा दौलतराव भोसले शाळेच्या मागील बाजूस गांधी मैदान इराणी खान शिवाजी स्टेडियम यादव नगर आणि विविध उद्याने या संशयास्पद ठिकाणी गांजाचे सेवन सुरू असल्याची आमची माहिती आहे .त्यामुळे गांजा विक्री तस्करी आणि सेवन करणाऱ्या वर कडक कारवाई करावी. गांजाचा सुळसुळाट रोखण्यासाठी एक वायू वेग पथक नेमावे आणि एक सक्षम पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली.
यावेळी अमित बाबर, संतोष कांदेकर, चैतन्य देशपांडे, सुनील कानूरकर, श्वेता सुतार, प्रतीक भोसले,रघुनाथ भावे, रोहित वेढे,अक्षय घाटगे,प्रथमेश देशिंगे, प्रिया माने, राजेश्री मिणचेकर,फिरोज मुल्लानी,सानिका दामूगडे,माधुरी जाधव,सिद्धी दामूगडे आदींसह युवासैनिक उपस्थित होते
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गांजाचा सुळसुळाट रोखा
|