बातम्या
सत्ताधारीकडून पैशाची सरळसरळ लूट -संजय पवार बोगस शिक्के... बोगस कामगाराची नोंद...
By nisha patil - 6/3/2024 9:55:57 PM
Share This News:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करून शासनाची दलालांमार्फत कोट्यावधी रुपयांची लूट सुरू असले बाबत...
बांधकाम कामगार व इतरांना सक्षम करण्यासाठी विविध करांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनेक सुविधा दिल्या जातात जेणेकरून ते व त्यांचे कुटुंबीय सर्व स्तरावर सक्षम व्हावेत अशा कुशल प्रामाणिक कामगार यांना भरपूर सुविधा मिळाल्याच पाहिजेत या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु गेल्या काही वर्षापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधी व त्यांचे पदाधिकारी बोगस शिक्के मारून बोगस कामगारांची नोंद केली जात आहे व त्यात आपला व आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा सहभाग असल्याशिवाय हे सर्व शक्य नाही बोगस नोंदणीमुळे विनाकारण शासनाची कोट्यावधी रुपयांची लूट होत असून काही राजकीय मंडळी आपला मतदार संघ सक्षम करण्यासाठी व मतदान वाढवण्यासाठी संबंधित खात्याचा दुरुपयोग करीत आहेत
जे ठेकेदार ( सिव्हिल इंजिनियर ) शिक्के मारून आपले कामगार किती आहेत याची आपल्याकडे यादी पाठवतात त्यातील काही ठेकेदार जे सत्य आहे तेवढ्याच कामगारांची यादी आपल्या सही शिक्क्यानिशी पाठवतात परंतु तेथे आपल्या कार्यालयातील काही दलाल व कर्मचारी बोगस सही शिक्के मारून लाभार्थी कामगारांची यादी मोठ्या प्रमाणात वाढवतात आपणास विनंती आहे या सर्व प्रकाराची माहिती लवकरात लवकर जाहीर करावी व होणारी शासनाची लूट थांबवावी अन्यथा आपल्या विरुद्ध वरिष्ठ पातळीवर आपली चौकशी करून निलंबनाची मागणी करण्यात येईल
सत्ताधारीकडून पैशाची सरळसरळ लूट -संजय पवार बोगस शिक्के... बोगस कामगाराची नोंद...
|