बातम्या
पाणी चोरणाऱ्यांवर महानगरपालिकेची कडक कारवाई
By nisha patil - 12/20/2023 6:05:29 PM
Share This News:
कोल्हापूर : आता चोरून पाणी वापरणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीररीत्या पाणी कनेक्शन जोडणाऱ्यावर कोल्हापूर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. दिवसभरात महापालिकेने फुलेवाडी रिंगरोड परिसरातील नागदेव कॉलनी, बालाजी पार्क, महालक्ष्मी कॉलनी, मथुरा नगरी, या शहरालगतच्या ग्रामीण भागात केलेल्या कारवाईत ६५ बेकायदेशीर नळ कनेक्शन तोडली. त्यावेळी अनेक गृहप्रकल्पांनी पाणी घेतल्याचेही निदर्शनात आले.
पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उपसा होत असलेले पाणी जास्त व बिलिंग कमी असा प्रकार होत आहे. त्यात गळती तसेच पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर आढळले. अनेकाने मीटरच्या पाठीमागून थेट पाणी घेतले आहे. तर अनेकांनी रिचार्ज परवानगी न घेता बेकायदेशीरपणे पाणी वापर केला आहे. नवीन कॉलनी मध्ये हा प्रकार होत असून एका लेआउट मध्ये मंजूर केलेल्या पाईपलाईन मधून पुढील आऊट साठी पाईप जोडत लांबचक पाईप झाली होती त्यावरील पुढील कलेक्शन बेकायदेशीर होती या प्रकारे अनेक ग्रह प्रकल्पांमध्ये बेकायदेशीर पाणी कनेक्शन घेतलेल्यांची संख्या दिसून आली. त्यानुसार रिंग रोडच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागात असलेल्या कॉलनीमध्ये पथकाने कारवाई केली. . प्रत्येक घराच्या कनेक्शनची तपासणी करत बेकादेशीर कनेक्शन तोडण्यात आली.
यापूर्वी परवानगी नसलेल्या कनेक्शन धारकांना तसेच मीटर रीडरनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता. त्यामुळे भागात किती बेकायदेशीर नळ कनेक्शन आहे त्याची माहिती देण्यास रीडरनाही सांगितले. बेकायदेशी कनेक्शन कोणी जोडून दिले याची माहिती संबंधित घर मालकांनी द्यावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. प्रशासक. के. मंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रिया पाटील, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडित, मीटर रीडर, सहाय्यक, फिटर यांनी यावर कारवाई केली आहे.
पाणी चोरणाऱ्यांवर महानगरपालिकेची कडक कारवाई
|