विशेष बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

Strike march of Anganwadi workers helpers at Zilla Parishad


By nisha patil - 6/21/2023 5:19:20 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढ केली मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही यासह अन्य प्रमुख मागण्यासाठी कॉम्रेड आप्पा पाटील आणि कॉम्रेड जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला महावीर गार्डन पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे थेट जिल्हा परिषदेवर येऊन धडकला. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा,नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी दणाणून सोडला. गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर दखल घेत नाही आहे. आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती.


अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा