बातम्या
ऊसतोडणी मजुरांचा संप
By nisha patil - 12/26/2023 4:59:50 PM
Share This News:
ऊसतोडणी मजुरांचा संप
साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष चिघळण्याची शक्यता
कोल्हापूरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा
कोल्हापुरात ऊसतोडणी दरवाढी संदर्भात मागील दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आता ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनांनी कोयता बंद अर्थात ऊस तोड बंदची हाक दिलीये. ऊस तोडणी वाहतूक दराबाबत नवीन करार होत नाही तोपर्यंत ऊस तोडी घेऊ नयेत असे आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे. कोल्हापूरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा संघटनेचे राज्य सरचिटणीस सुभाष जाधव यांनी केले आहे. त्यामुळे आता साखर कारखानदार आणि ऊस तोड कामगार यांच्यातील संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
ऊसतोडणी मजुरांचा संप
|