बातम्या

अदानींच्या प्रकल्पाला पाणी देण्यास भुदरगडातून तीव्र विरोध

Strong opposition from Bhudargarh to give water to Adani's project


By nisha patil - 12/20/2023 6:02:20 PM
Share This News:



पाटगाव धरणाच्या पाण्याचा वापर करून अदानी ग्रुप हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट करणार असून या धरणातील पाण्याचा थेंब दिल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा भुदरगड तालुकावासियानी  दिला आहे. या विरोधात बुधवारी गारगोटी येथे ती आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना देण्यात आले आहे.
   

पाटगाव धरण भुदरगड तालुका सह कागल अनेक कर्नाटकातील अनेक गावांसाठी जीवनदायी आहे. सध्या पाण्याची परिस्थिती कठीण असताना आज आणि उद्योग समूह पाटगाव धरणाच्या पाण्याचा वापर करून अंजीवडे, ता. कुडाळ येथे हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट करीत आहे. या विरोधात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे प्रस्तावित प्रकल्प रद्द झालाच पाहिजे हे सर्व भुदरगड तालुक्यातील जनतेची मागणी आहे या धरणातील पाणी प्रकल्पाला दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


अदानींच्या प्रकल्पाला पाणी देण्यास भुदरगडातून तीव्र विरोध