बातम्या
उचगांव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शेने
By nisha patil - 12/2/2024 6:10:53 PM
Share This News:
उचगांव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शेने
सातारा ते कागल हायवे रस्त्याचे सहा पदरी करणाचे काम चालु आहे. पुर्वी रस्त्याच्या चार पदरी करणावेळी पुल व रस्ता करताना बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास १५ ते २० वर्षे गावातील नागरीक भोगत आहेत. हुपरीला जाणारा उचगांव हायवे पुल व तावडे हॉटेल मुख्य पुल याची उंची व रूंदी कमी ठेवल्याने सतत वाहतुकीच्या कोंडीमुळे उचगांवकर व आजुबाजूच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. सद्या रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम चालु असल्याने उचगांवातील माळीवाडा पुला पलिकडे उचगांवातील साधारण ४०० ते ५०० एकर शेत जमीन,शाळा, कॉलेज असल्याने माळीवाडा पुलाखाली सतत वर्दळ आहे. पुर्वी पुल लहान केल्याने शेतकरी आपला ऊस नेहत असताना त्या पुलाखालुन उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात नसल्याने त्यांना परत अर्धाकिलो मीटर फिरून हुपरी हायवे पुलाखालुन रहदारीच्या मार्गावरून जावे लागत आहे. तसेच उचगांवातील गणेश उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्ती विर्सजनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीसह माळीवाडा पुलाखालुन जात नसल्याने त्या मंडळांना प्रमुख हुपरी हायवे पुलाखालुन जाताना तिथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. उचगांवकरांना शेतामध्ये हायवे पलिकडे जाण्यासाठी माळीवाडा पुल सोईस्कर असल्याने ५० हजार लोक संख्येच्या गावातून हा रस्ता जाताना गावातील नागरीकांना या हायवे प्रशासन तसेच या भागातील केंद्रातील लोक प्रतिनिधींनी विश्वासात घेतले नाही या माळीवाडा पुलाची उंची, रूंदी वाढविणार नसल्याचे समजते. यापुर्वी हायवे प्रशासनाला निवेदन देवून ही हयाबाबत ठोस असा निर्णय झाला नाही. म्हणून उंचगांवातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्या वतीने हायवे पुलावरती तिव्र निदर्शने करून हायवे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यात आले. यानंतर ही याबाबत ठोस असा निर्णय झाला नाही तर विविध मार्गाने आंदोलन करणेत येणार असे शिवसेना व काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण व दिपक रेडेकर म्हणाले की, महामार्गाचे करोडो रुपयांचे काम सुरू असताना उंचगाव सारख्या पन्नास हजार लोकसंख्येच्या गावावर अन्याय का होत आहे? अनेक ठिकाणी जुने पूल पाडून मोठमोठे पूल बांधले जात आहेत परंतु माळीवाडा पूला संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढे हायवे रोको चे आंदोलन उंचगाव मधील सर्व शेतकरी, नागरिक, शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने करण्यात येईल.
यावेळी शेतकरी व नागरिकांनी हायवे प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
साईट इंजिनिअर महेश पाटोळे व हायवे पेट्रोलिंगचे इनचार्ज प्रविण भालेराव यांनी सांगितले की पूलासंदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव अधिकाऱ्यांना म्हणाले की, फक्त प्रस्ताव पाठवल्याचे आम्हाला सांगू नका तर मंजुरीचे पत्र जोपर्यत तुम्ही आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत शिवसेना, काँग्रेस व शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलने चालूच राहतील व यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण, दिपक रेडेकर, सुनील पोवार,विक्रम चौगुले, दिपक पाटील, महेश जाधव, विराग करी, संतोष चौगुले, सुनील चौगुले, संजय निगडे, दत्ता फराकटे, उत्तम अडसुळे, कैलास जाधव, अवि मोळे, दादासो यादव, अजित पाटील, अजित चव्हाण, आबा जाधव, अरविंद शिंदे, दिपक फ्रेमवाला, दिपक पोपटाणी,सुनील पारपाणी, किशोर कामरा, अरविंद शिंदे, सोमनाथ तोडकर, श्रीधर कदम, श्रीकांत माळी, दिनकर पवार, आनंदा माळी, बाबुराव पाटील, सूरज रेडेकर, सूरज इंगवले, अशोक कासुटे, तानाजी माळी, अनिल माळी, दिपक माळी आदी उपस्थित होते.
उचगांव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शेने
|