बातम्या
महानगरपालिका शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा चाचणीला विद्यार्थ्यांचा उस्तुर्फ प्रतिसाद
By nisha patil - 12/26/2023 2:47:44 PM
Share This News:
महानगरपालिका शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा चाचणीला विद्यार्थ्यांचा उस्तुर्फ प्रतिसाद
कोल्हापूर : महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमांतर्गत घेतलेल्या पहिल्या चाचणी परीक्षेत ५ हजार ६५५ विद्यार्थ्यांपैकी ५हजार ३९२ विद्यार्थी बसले होते. उर्वरित २६३ विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत त्यामुळे या चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
या परीक्षेतील भारताचे संविधान या विषयावरील पहिली चाचणी पार पडली. वैयक्तिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही पुढच्या चाचणीला या परीक्षेला शंभर टक्के विद्यार्थी बसावेत असे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा आणि त्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी या उद्देशाने भारताचे संविधान भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, महाराष्ट्रातील संत व संत साहित्य, आणि बुद्धिमापन चाचणी हे चार विषय विद्यार्थ्यांना अतिरिक्तपणे शिकवण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त केसर जाधव यांनी सांगितले.
चाचणी परीक्षा नाही उदुर्तूनही घेण्यात येत आहे. परिषदेचे अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांच्या धर्तीवर घेण्यात येत आहेत. परीक्षा नकारात्मक पद्धतीने नुसार होत असून बरोबर उत्तरासाठी दोन मार्क आणि चुकीच्या उत्तरासाठी अर्धा भाग कमी अशा पद्धतीने घेण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
या परीक्षेला अनुपस्थितीत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून पुढील चाचणी वेळी पुन्हा परीक्षा देता याव्यात. यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना संबंधित शिक्षकांना द्याव्यात असे मुख्याध्यापकांना कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा चाचणीला विद्यार्थ्यांचा उस्तुर्फ प्रतिसाद
|