बातम्या

प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्यांची वस्तीगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Students commit suicide by hanging themselves in the hostel due to love affair


By nisha patil - 5/24/2024 1:25:29 PM
Share This News:



पन्हाळा ( प्रतिनिधी) पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या बुधवारपेठ येथिल नरके पब्लिक स्कूल पन्हाळा शाळेमधील बारावीत प्रवेश घेतलेल्या अभय हणमंत देवकाते (वय १७) बारामती याने सुसाईड नोट लिहुन ठेवत शाळेतच गळफास घेवून आत्महत्या केली 
   अधिक माहिती प्रमाणे, अभय हा पाचगणी येथील शाळेत शिकत होता येथील शाळा बंद पडल्याने त्याच्या पालकांनी पन्हाळा येथील त्याचा येथील निवासी शाळेत प्रवेश घेतला शाळेत प्रवेश घेवुन अवघे चारच दिवस झाले होते गेले दोन दिवस तो आपल्या वहीत कांहीतरी लिहीत बसलेला असायचा इतकीच माहिती मिळत असुन त्याच्या मृत्यूनंतर पन्हाळा पोलीसांनी ती वही ताब्यात घेतली असता त्याचे पाचगणी शाळेतील जुने मित्र व प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे लिहुन ठेवल्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले या बाबतीत गुन्हा नोंद झाला असुन तपास पोलीस निरीक्षक महेश इंगळे करत आहेत


प्रेम प्रकरणातून विद्यार्थ्यांची वस्तीगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या