बातम्या

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष

Students focus on the result of 10th and 12th board exam


By nisha patil - 10/5/2024 4:57:24 PM
Share This News:



राज्यात दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.  इयत्ता दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते. तर इयत्ता बारावीसाठी 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्या उत्तर पत्रिकेच्या तपासण्याकडे बोर्डाचं लक्ष बारिक लक्ष आहे. मागील वर्षी दहावीचा  राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला होता. त्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला होता.  बारावीचा निकाल  91.25 टक्के लागला होता.
 

बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र त्यापूर्वीच बोर्डाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे बोर्डाने परिक्षा शुल्कात वाढदेखील करण्यात आली आहे. 
 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा - 2025 साठी सुधारीत परिक्षा फी आकारली जाणार आहे. तर दहावीच्या नियमित आणि पुनर्परीक्षार्थींसाठी 420 रुपयांवरून 470 रुपये तर खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज आणि नोंदणी शुल्क 1 हजार 340 रुपये इतके असणार आहे. सध्या महागाईचा फटका सगळ्याच क्षेत्राला बसताना दिसत आहे. छपाई आणि स्टेशनरी दरात वाढ झाली आहे. त्यामुळेच परीक्षा फी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाने म्हटलं आहे.सुधारीत परीक्षा शुल्कासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.


दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष