बातम्या
विद्यार्थ्यांनी तयार केले चंद्रयान ३चे पेपर मॉडेल
By nisha patil - 12/7/2023 6:02:26 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) पेठ वडगाव येथे आदर्श गुरुकुल विद्यालय व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान ३चे पेपर मॉडेल तयार केले.महात्मा गांधी मिशन ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रयान ३ याचे पेपर मॉडेल कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) अंतर्गत १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान ३ यान अवकाशात झेप घेणार आहे आणि याच अनुषंगाने चंद्रयान एक, दोन आणि तीन याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेसाठी एकूण २१० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मार्गदर्शनानंतर योग्य असे पेपर मॉडेल तयार केले. यावेळी कार्यशाळेसाठी आदर्श गुरुकुल अकॅडमीचे अध्यक्ष डाॅ.डी.एस घुगरे, सचिवा सौ. एम. डी घुगरे, ग्रीन व्हॅली विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी शिवई प्रमुख उपस्थिती होती.प्रशासक एस.जी जाधव व एस. ए. पाटील, अशोक क्षीरसागर, रवींद्र मोरे, डॉ. अमोल पाटील, प्रकाश जगदाळे व नारायण कोळेकर आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख, विद्यालयातील विज्ञान शिक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
विद्यार्थ्यांनी तयार केले चंद्रयान ३चे पेपर मॉडेल
|