बातम्या

आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी

Students of Adarsh ​​Gurukul Vidyalaya performed well in kick boxing competition


By nisha patil - 2/9/2024 12:37:34 PM
Share This News:



आज, 1 सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे पार पडलेल्या असोसिएशन राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली. याशिवाय, विनर ज्युनिअर चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवली आहे.

*सुवर्ण पदक विजेते:*
1. ओम राऊत
2. विघ्नेश निंबाळकर
3. प्रेम वाघमारे
4. आर्यन कचरे
5. अंशुमन जाधव
6. रितेश पाटील
7. प्रतीक गायकवाड
8. यशश्री परमाज

*रौप्य पदक विजेते:*
1. रुद्र सावंत
2. विराट पुजारी
3. पारस चव्हाण
4. सर्वेश पाटील
5. विश्वराज मेटकरी
6. साक्षी कुरणे

*कांस्य पदक विजेते:*
1. संग्राम आव्हाळे
2. आदर्श तलगर
3. राजेश पवार

या यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श गुरुकुल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री डी.एस. घुगरे सर, संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ. एम.डी. घुगरे मॅडम, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक श्री आर.बी. शिवई सर, प्रशालेचे प्रशासक श्री एस.जी. जाधव सर, विभागाचे प्रशासक श्री एस.ए. पाटील सर, जिमखाना प्रमुख श्री एन.ए. कुपेकर सर, श्री एस.एस. मदने सर आणि प्रशिक्षक श्री अक्षय शिंदे सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. 

या विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आदर्श गुरुकुल विद्यालयाचे नाव आणखी मोठे झाले आहे.


आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा किक बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी