शैक्षणिक
४५ वर्षांनी भेटले सायबर कॉलेज कोल्हापूरचे विद्यार्थी
By nisha patil - 3/29/2025 5:21:42 PM
Share This News:
४५ वर्षांनी भेटले सायबर कॉलेज कोल्हापूरचे विद्यार्थी
टाकळीवाडी प्रतिनिधी कोल्हापूर सायबर कॉलेजचे 1980- 81 वर्गमित्र भेटले 45 वर्षांनी एकत्र येऊन गेट-टुगेदर साजरा केला.या गट-टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.एम. हिलगे सर हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून सुरुवात त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक हिलगे सरांचा सत्कार करण्यात आला.या गेट-टुगेदर साठी एकूण 40 जणांची उपस्थिती होती.
विखुरलेल्या मित्रांना एकत्र करण्यासाठी सर्वप्रथम सायबर कॉलेजमधून विद्यार्थ्यांची 1980- 81 वर्षाची यादी घेऊन विद्यार्थ्यांना गेट-टुगेदर साठी पत्र पाठवण्यात आले. हे पत्र प्रत्यक्षात 40 जणापर्यंत पोहोचले. एकूण विद्यार्थी संख्या६८ होती. गेट-टुगेदर परत परत पुढे व्हावा असे प्रतिपादन वर्ग मित्रांनी केली.
काही विद्यार्थी आपणाला सोडून गेल्याबद्दल तसेच काही शिक्षक सुद्धा हयातीत नसल्याने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मित्रांची जुनी आठवण ताजी झाली. सर्वांनी आनंदाने नाष्टा जेवण करून आपले नेतृत्व पुन्हा तयार केले. ४५ वर्षांनी एकत्र येणे हा परमेश्वराचा एक भाग आहे असे उद्गार मित्राकडून येत होते.
अनेक मित्रांची मनोगते व आपला परिचय करून देण्यात आला. एकमेकांना सदिच्छा देण्यात आल्या सर्वांना आरोग्य चांगले लाभो अशी विनंती परमेश्वर चरणी करण्यात आली.
हिलगे सर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा मुख्य हेतू होता. माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले याचा मला अभिमान आहे. सायबर कॉलेजचे ५०० विद्यार्थी परदेशात आहेत ही फार चांगली गोष्ट आहे.
वर्षाला 35 ते 40 लाख स्कॉलरशिप दिली जाते विद्यार्थ्यांना तसेच अतिशय कमी खर्चात चांगले शिक्षण दिले जाते. या गेट-टुगेदर साठी परिश्रम तसेच सर्व नियोजन गजानन शिंदे केले. नाष्टा व जेवण्याची जबाबदारी राजेंद्र नागेश कर यांनी केली.
सर्व मित्रांना भेटवस्तू किशोर जाधव यांनी दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी रमेश पुनुगडे राहुल यादव डी. डी. जाधव वकील बाजीराव पाटील प्राचार्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सायबर च्या एम एस डब्ल्यू विभागाच्या डॉ. रजपूत मॅडम व त्यांचे सहकारी प्राध्यापक यांचेही सहकार्य लाभले सायबर चे अध्यक्ष डॉ आर ए शिंदे यांच्या सहकार्य तसेच मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पार पडण्यास मदत झाली
४५ वर्षांनी भेटले सायबर कॉलेज कोल्हापूरचे विद्यार्थी
|