बातम्या

कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली इसरोकडे (ISRO) गगनभरारी

Students of Kolhapur Municipal School have taken ISRO sky high


By nisha patil - 10/2/2025 7:16:37 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या  58 शाळा असून या शाळांमधून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्तीमध्ये उज्वल यश संपादन करीत आहेत. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 56  विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. यापैकी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या 21 विद्यार्थ्यांची बंगळूरु येथील इसरोला भेट घडवून आणली जात आहे. या मोहिमेसाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले आहे. तर उपायुक्त साधना पाटील यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 आज महापालिकेच्या मुख्य चौकातून सकाळी 12 वाजता रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना के.एम.टी.च्या वातानुकीत सजविलेल्या बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व रवाना करण्यासाठी आमदार अमल महाडीक, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.

            यावेळी आमदार अमल महाडिक यांनी बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमधून गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे असलेचे  सांगितले. तर आमदार जयंत आसगांवकर यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शाळेतील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे गौरवोद्गार यशस्वी विद्यार्थ्यांना रवाना करतेवेळी केले. या विद्यार्थ्यांच्यासोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत. हे विद्यार्थी एअर पोर्टवर गेलेवर या ठिकाणी एअर पोर्टच्या मॅनेजमेंटच्यावतीने या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन केक कापण्यात आला.


कोल्हापूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली इसरोकडे (ISRO) गगनभरारी
Total Views: 71