बातम्या

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांकडून रायगडावर स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती अभियान व वाहतूक नियंत्रणास मदत

Students of National Service Scheme Department help in cleanliness drive plastic removal campaign and traffic control at Raigad


By nisha patil - 6/6/2023 5:30:41 PM
Share This News:



 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पावणेदोनशे हून अधिक स्वयंसेवकांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त दुर्गराज रायगडावर स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्ती अभियान आणि वाहतूक नियंत्रणासाठी मदत केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के  व इतर अधिकाऱ्यांनी रायगडावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या उपक्रमास प्रोत्साहन दिले. 
    राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभागाचे विद्यापीठस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दोन जून ते आठ जून या कालावधीत सुरू आहे .  350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने हे विशेष संस्कार शिबिर संपन्न होत आहे.  या शिबिरांतर्गत शिवाजी विद्यापीठात आणि किल्ले रायगड वरती विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम प्लास्टिक मुक्ती अभियान राबवले याअंतर्गत सुमारे 13000 किलोहून अधिक केरकचरा प्लास्टिक विद्यार्थ्यांनी गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली . पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लॅस्टिक कचरा यांची90 हून अधिक पोती संकलित करून त्याच्या पुनरुत्पादनासाठी  तो एकत्रित करून ठेवला.किल्ले रायगडावर  विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. 
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी, महाराजांचे जल संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचे तत्व अंगीकारावे, योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी जीवनात वाटचाल करावी असे आवाहन केले. विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी एस पाटील, माजी बीसीयुडी संचालक आणि शहाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे,वित्त व लेखा अधिकारी डॉ.अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड,एन. एस .एस विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले, नवयुग शिक्षण संकुल महाडचे अध्यक्ष रंजीतसिंह भोसले, प्रशासकीय अधिकारी एस. एम. पालकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
एन एस एस चे प्रोग्राम ऑफिसर डॉ. के. एम .देसाई डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ संदीप पाटील,डॉ.कुलकर्णी डॉ. सयाजीराव , डॉ.संग्राम मोरे, प्रा. आशुतोष मगदूम, एस. ए. मुंडे ,डॉ.पी.बी.पाटील यांनी संयोजन केले. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांनी शिवचरित्रावरती व शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी पर्यावरण आणि प्लास्टिक मुक्ती अभियान या संदर्भात विद्यार्थ्यांना व्याख्याने दिली. 
याउपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मानसिंग बोंद्रे, शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचेही प्रोत्साहन मिळाले. 
एन. एस. एस. विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले,
डॉ. के. एम. देसाई डॉ.ऐ.बी.बलुगडे यांनी संयोजन केले. डॉ.पी.बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सर्व प्रोग्रॅम अधिकारी व टीम लीडर यांनी विद्यार्थ्यांच्याकडून श्रमदान करून घेतले. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.  शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील  एनएसएस विभागाचे अनेक विद्यार्थी या  शिबिरात सहभागी झाले आहेत.


राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांकडून रायगडावर स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती अभियान व वाहतूक नियंत्रणास मदत