बातम्या

श्रद्धा ओलंपियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला चंद्रयान 3 चा भव्य दिव्य सोहळा सोहळा....

Students of Shraddha Olympiad School experience the grand celestial ceremony of Chandrayaan 3


By nisha patil - 8/23/2023 7:47:07 PM
Share This News:



 इचलकरंजी - सोलगे मळा, शहापूर येथील श्रद्धा ओलंपियाड स्कूलमध्ये 23 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्यासाठी चांद्रयान 3 याचे चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याचे तसेच चंद्रावर उतरण्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचे आयोजन केले होते.  इयत्ता 5वी ते 7वी च्या जवळ जवळ 1400 विद्यार्थ्यांनी या आनंदमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी क्रीडांगणावर  गर्दी केली होती.   जसजसा हा ऐतिहासिक क्षण जवळ येत होता तसतसा सर्वांच्याच उत्साहाला उधाण येत होते.  सायंकाळी 6.00 वाजून  4 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्याचे  बघताच सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गजर केला व सर्व क्रीडांगण भारत माता की जय,  वंदे मातरम च्या घोषणेने दुमदुमुन गेला.

 याप्रसंगी शाळेचे संस्थापक, श्री ए.आर. तांबे, समन्वयक श्री.एम.एस.पाटील, सौ. सुप्रिया कौंदाडे, सौ.संगीता पवार,श्री.अक्षय तांबे, श्री.अभिषेक तांबे, प्रिन्सिपल सौ.किरण स्वरूपा, व्हा.प्रिन्सिपल श्री.श्रवण तिवारी, श्री.वैभव अग्रवाल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बरोबर या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला


श्रद्धा ओलंपियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला चंद्रयान 3 चा भव्य दिव्य सोहळा सोहळा....