शैक्षणिक
विद्या वर्धिनी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा परिश्रम 1.0 स्पर्धेत भव्य विजय!
By nisha patil - 11/3/2025 11:18:10 PM
Share This News:
विद्या वर्धिनी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा परिश्रम 1.0 स्पर्धेत भव्य विजय!
विद्यावर्धिनी शाळेने 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कांस्यपदकांची केली कमाई!
गोवा : विद्या वर्धिनी शिक्षण संस्था, उसगाव टाकवाडा येथील विद्यार्थ्यांनी नारायण झांटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बिचोलीम-गोवा आयोजित "परिश्रम 1.0" क्रीडा स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एकूण 17 पदके जिंकत सर्वोत्कृष्ट शाळा अजिंक्यपदाचे मानकरीपद पटकावले.
स्पर्धेत एकूण 100 सहभागींपैकी विद्या वर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकत एकूण 44 गुणांसह सर्वसाधारण अजिंक्यपद (Best School Championship) मिळवले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अतुलनीय क्रीडाप्रदर्शनाने संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांची कामगिरी:
1. गौरवी गवडे – 1 सुवर्ण, 2 रौप्य
2. नाझ नल्लीकुन – 2 सुवर्ण
3. सायश गवडे – 2 सुवर्ण
4. मोहम्मद कलीम नदाफ – 2 सुवर्ण
5. महीबुब कसाब – 1 सुवर्ण, 1 रौप्य
6. राजशेखर गुंडमठ – 1 सुवर्ण
7. सांयोग कणेकर – 1 सुवर्ण
8. दीपिक्षा पवार – 2 रौप्य
9. शादाब टोपिनकट्टी – 1 रौप्य
10. आरती सुतार – 1 कांस्य
विद्यार्थ्यांच्या या भव्य विजयाबद्दल संपूर्ण शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
विद्या वर्धिनी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा परिश्रम 1.0 स्पर्धेत भव्य विजय!
|