बातम्या
विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे
By nisha patil - 3/9/2024 9:35:17 PM
Share This News:
अभियांत्रिकी हे बहुआयामी क्षेत्र असून यामध्ये आव्हाने आणि संधी याची कमतरता नाही. विविध आव्हानांकडे सकारत्मकदृष्टीने पाहून समाजातील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकीची कौशल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअर करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करावे असे आवाहन ‘कोकोनट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक मनीष अडवाणी यांनी केले.
भारतीय उद्योग महासंघ (CII) दक्षिण महाराष्ट्र झोन इंडस्ट्री अॅकॅडेमिया पॅनलच्यावतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सीआयआय-सीईओ कनेक्ट सीरीज आणि लीडरशिप टॉकचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून 'कोकोनट मॅन’ मनीष अडवाणी बोलत होते.
अडवाणी हे मिमो पोटेंशिओ प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ असून पुरस्कार विजेते कथाकार, व्याख्याते न नारळाच्या शेंड्याच्या विविध उपयोगावर काम व मार्गदर्शन करतात. सूर्यप्रकाशात वाळलेल्या नारळाच्या शेंड्याचा वापर करून त्यांनी घराचा नमुना तयार केला आहे. त्याचबरोबर नारळाच्या शेंड्यापासून विविध कलाकृती बनवण्यासहि ते प्रोत्साहन देतात.
अडवाणी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील आव्हानांचा सामना करून संधी कशा साधता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. ग्रीन एनर्जी, ऑटोमेशन, रोबॉटिक्स क्षेत्राततील विविध संधी आहेत आणि या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.
सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनचे उपाध्यक्ष आणि टूलेक्स इंजिनिअरिंग,कोल्हापूरचे मॅनेजिंग डायरेक्टर सारंग जाधव यांनी अभियांत्रिकीच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक प्रमुख कौशल्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणातील अनुभव शेअर करत सांगितले की, पैशांच्या मागे धावू नका, उत्तम काम करा, पैसा आपोआप तुमच्याकडे येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीन (सीडीआर) प्रा. सुदर्शन सुतार यांनी केले तर आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांनी मानले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सीआयआय दक्षिण विभाग अध्यक्ष अजय सप्रे, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, संचालक डॉ. अजित पाटील, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे
|