बातम्या

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत - सौ.स्वरुपा पाटील यड्रावकर

Students talent should flourish  Mrs Swarupa Patil Yadravkar


By nisha patil - 1/16/2025 8:16:16 PM
Share This News:



विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत - सौ.स्वरुपा पाटील यड्रावकर

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेस उत्साहात प्रारंभ.

दत्तवाड :  जिल्हा परिषद कोल्हापूर ,शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ आयोजित तालुकास्तरीय कलाविष्कार सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन कलानगरी केंद्र शाळा नांदणी ता.शिरोळ येथे सुरु झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.स्वरूपा पाटील यड्रावकर म्हणाल्या की बालमन जे जिल्हा परिषदेच्या शाळात शिकणाऱ्या मुलांना घडविणारे शिक्षक प्रतिभावान आणि कल्पकता असणारे आहेत त्या सर्वांचे कौतुक करते. अभिनंदन करते. जी प्रतिभावान उद्याचे भविष्य आहेत,सुजाण नागरिक आहेत. त्यांना घडविण्यासाठी प्रतिभावान शिक्षकांची गरज आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळामधून जबाबदारी घेणारे हे शिक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे.

आपल्याला दिसते सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा रूप बदलत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे. त्याच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करुन अभिवादन करते.  स्वागत केंद्र प्रमुख शिवाजी भोसले यांनी तर प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांनी केले. आभार केंद्र समन्वयक प्रकाश खोत यांनी मानले. याप्रसंगी गटविकास अधिकारी नारायण घोलप,सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,सरपंच संगीता तगारे,उपशिक्षणाधिकारी प्रिमेश वाघ,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,नारायण पाटील, उपसरपंच वैशाली महावीर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा, सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी,चेअरमन व संचालक शिक्षक बँक व शिक्षक पतसंस्था,सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत - सौ.स्वरुपा पाटील यड्रावकर
Total Views: 54