बातम्या
स्टाइल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 उत्साहात संपन्न
By nisha patil - 4/9/2023 5:39:56 PM
Share This News:
स्टाइल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 उत्साहात संपन्न
राज्यातून 40 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला
स्पर्धकांचा उत्साही प्रतिसाद
अक्षय अक्षय मोरे फिल्म प्रोडक्शन आयोजित स्टाईल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 202३ हा पेशंट सोहळा उत्साहात संपन्न झाला यामध्ये किड्स मिस्टर मिस अँड मिसेस या कॅटेगरी मधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल असे दोन राउंड यामध्ये घेण्यात आले .आपली ओळख , टॅलेंट आणि प्रश्न उत्तरे असेही राऊंड मध्ये घेण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये छोट्या मुलांचा सहभाग अधिक होता. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य कृष्णा फाउंडेशनच्या सोनाली राजपुत, आई दुर्गा फाउंडेशनच्या अश्विनी डेगे, राज चामाटे , प्रियंका मोरे सुमया पठाण निलेश भोसले हितेश निंबाळकर यांचे लाभले. तर ग्रुमिंग साठी सोनाली राजपूत यांनी मार्गदर्शन केलं. किड्स कॅटेगिरी मध्ये स्वरा, वीर भानुशाली ,काव्य आणि प्रांजल हे शो स्टॉपर ठरले. तर मिस कॅटेगिरी मध्ये श्वेता कलुगडे, मिसेस कॅटेगरीमध्ये सुरेखा शेजाळे हे ठरले या पेजेण्ट ला मीडिया पार्टनर म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तारा न्यूज ने काम पाहिले, त्याचबरोबर अक्षय मोरे आणि शैलजा मोरे यांच्यामुळे स्पर्धकांना हे स्टेज मिळालं. विजेत्यांना क्राऊन सॅश आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं. तेजल वाखरेकर,योजना खेरे ,प्रीती शेटे स्मिता सावंत, वर्षा जोशी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया देसाई यांनी केलं
स्टाइल आयकॉन फेस ऑफ कोल्हापूर 2023 उत्साहात संपन्न
|