बातम्या

सुभेदार'ने वीकेंडला पार केला पाच कोटींचा टप्पा

Subhedar crossed the five crore mark over the weekend


By nisha patil - 8/28/2023 6:55:39 PM
Share This News:



मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.सुभेदार' हा बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा 'सुभेदार' प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ते सहकुटुंब हा सिनेमा पाहायला जात आहे. हातात भगवा झेंडा आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत प्रेक्षक 'सुभेदार' सिनेमा पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


सुभेदार'ने वीकेंडला पार केला पाच कोटींचा टप्पा