बातम्या

सुभेदार चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत केली कोट्यवधींची कमाई

Subhedar movie earned crores in last five days


By nisha patil - 8/30/2023 6:06:16 PM
Share This News:



25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट सुभेदार ने गेल्या पाच दिवसात कोठ्यावधींची कमाई केली आहे. नेमकेच शोज आणि बॉलिवूड कडून चित्रपटांकडून तगडी टक्कर असतानाही ‘सुभेदार’ने केलेली कमाई कौतुकास्पद आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मौठी फौज आहे. यामध्ये अजय पूरकरने तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.‘सुभेदार’ने आतापर्यंत जवळपास 6.48 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. तर रविवार कमाईचा आकडा 2 कोटींवर पोहोचला.सुभेदारची आतापर्यंतची कमाई हि शुक्रवारच्या दिवशी 1.15 कोटी रुपये तर शनिवार- 1.69 कोटी रुपये, रविवार- 2.22 कोटी रुपये, सोमवार- 0.72 कोटी रुपये मंगळवार- 0.70 कोटी रुपये आणि एकूण- 6.48 कोटी रुपये अशी कमाई या चित्रपटाने केली आहे.


सुभेदार चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत केली कोट्यवधींची कमाई