बातम्या

बी आर एस पक्षाच्या आंदोलनास यश: ठिबक सिंचन अनुदान महिना अखेर होणार वितरित

Success of BRS partys agitation


By nisha patil - 12/8/2023 5:20:20 PM
Share This News:



बी आर एस पक्षाच्या वतीने काल जिल्हा अधीक्षक कृषी श्री दत्तात्रय दिवेकर यांना संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते .ठिबक सिंचन अनुदान व यांत्रिकीकरण अनुदान महिना अखेरपर्यंत न मिळाल्यास मोर्चा काढून कार्यालय बंद पाडून टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता .11 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन परिपत्रक काढून ८०.४६ कोटी सिंचन अनुदान वितरित करण्याबाबत सूचना दिली होती .सदरचा निधी हा केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा मिळून आहे या निधी पैकी किमान एक कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील  शेतकरी लाभार्थ्यांना मिळावे असे आम्ही मागणी केली होती. त्याच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी श्री दत्तात्रय दिवेकर म्हणाले महिना अखेरपर्यंत आपण अंदाजे एक कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित करू तसेच यांत्रिकीकरणाच्या अनुदानाच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये परिपत्रक निघाले की पंधरा दिवसात आपण यांत्रिकीकरणाचे अनुदान तातडीने वितरित करू आंदोलन इशाऱ्याची गांभीर्याने नोंद घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी यांनी याप्रमाणे आश्वासन दिले आहे त्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने महिनाअखेरपर्यंत वाट पाहून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रक भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते श्री संजय पाटील, जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु, संग्राम जाधव, दिलीप चव्हाण, विक्रम जरग ,सतीश मोटे, समीर दानवाडे ,भीमराव पाटील


बी आर एस पक्षाच्या आंदोलनास यश: ठिबक सिंचन अनुदान महिना अखेर होणार वितरित