राजकीय

काँग्रेसचे यश म्हणजे भाजप विरुद्ध चा नागरिकांचा रोष : आ.सतेज पाटील

Success of Congress is anger of citizens against BJ P A Satej Patil


By nisha patil -
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अबूतपूर्व यश मिळाला असून भाजपचा धुवा उडालाय. या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने या विजयाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कडून कर्नाटकातील विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशां चा गजर ,फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि साखर पेढे वाटून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस विजयाच्या जोरदार घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून हलगीवर ठेका धरला.
कर्नाटकातील नागरिकांनी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत देत भाजप विरोधात असलेला रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तौफिक मुलानी ,शशांक बावस्कर, राजाराम गायकवाड, वैशाली महाडिक ,चंदा बेलेकर, दुर्वास कदम, शिवाजी कांबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काँग्रेसचे यश म्हणजे भाजप विरुद्ध चा नागरिकांचा रोष : आ.सतेज पाटील