बातम्या
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे यश
By nisha patil - 6/16/2023 8:10:32 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम गोवा येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये इचलकरंजीतील पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . या स्पर्धेत एकूण पंधराशे मुले सहभागी झाले होते त्यापैकी पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या बहुतांश मुलाने 200 पैकी 200 गुण मिळवत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेत पटकावले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ .सविता संजय भन्साली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सध्या पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या 35 शाळांमध्ये 3000 विद्यार्थी अबॅकसचे ट्रेनिंग घेत आहेत ऑनलाइन ऑफलाईन माध्यमातून देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बॅचेस सध्या सुरू आहेत.
इन्स्टिट्यूटच्या संचालिका सविता भन्साली यांना बेस्ट फ्रेंचाईजी म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेला आहे.मास्टर अबॅकस एज्युकेशन अकॅडमीचे संचालक श्री शिवराज पाटील सर यांनीही सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे यश
|