बातम्या
विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंचा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत यश
By nisha patil - 2/14/2025 11:37:39 AM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंचा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत यश
कोल्हापूर: १४ फेब्रुवारी – कश्मीर गुलमर्ग येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. गायत्री लोळगे (बी.एस्सी. भाग 3) आणि वैष्णवी पाटील (बी.कॉम. भाग 2) यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना टीम टार्गेट आणि टीम डिस्टन्स या खेळ प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल डिस्टन्स खेळ प्रकारात गायत्री लोळगे हिला रौप्य पदक मिळाले.
या स्पर्धेत भारतातील विविध विद्यापीठांची ४५ प्रतिनिधी संघ सहभागी झाले होते. यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव सौ. शुभांगी गावडे, सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी. जोग व श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद महाविद्यालयाच्या खेळाडूंचा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत यश
|